म्यानमारच्या अमलीपदार्थ तस्कराला अटक

म्यानमारच्या अमलीपदार्थ तस्कराला अटक
Published on

अमलीपदार्थ तस्कराला अटक

तस्करीचे मोठे जाळे तपास यंत्रणांकडून उद्‍ध्वस्त


गुवाहाटी, ता. १७ (वृत्तसंस्था) : भारत-म्यानमार सीमेवर कार्यरत असलेल्या एका आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीटोळीविरोधातील कारवाईत अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) मोठे यश मिळवत म्यानमारचा प्रमुख तस्कर थानसिनटू आंग ऊर्फ चिटूआंग ऊर्फ ट्लुआंगा याला नवी दिल्ली येथून अटक केली आहे. गुप्त माहिती संकलन, विविध राज्यांतील समन्वय आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार, चिनटुआंग हा म्यानमार-मिझोराम-मणिपूर-आसाम-त्रिपुरा या भागात कार्यरत असलेल्या सर्वांत महत्त्वाच्या तस्करांपैकी एक असून तो म्यानमारमधून मेथॅम्फेटामाइन आणि हेरॉइनचा मोठा आंतरराष्ट्रीय पुरवठादार म्हणून ओळखला जातो. तो सीमापार तस्करी नेटवर्कचे उभे करून मिझोराम, मणिपूर, आसाम आणि त्रिपुरामार्गे भारत व बांगलादेशातील विविध भागांत अमली पदार्थांची वाहतूक करत होता, असे तपासात उघड झाले आहे.
एनसीबी आणि इतर अमली पदार्थविरोधी कायदा अंमलबजावणी संस्थांनी (डीएलईए) नोंदवलेल्या अनेक एनडीपीएस प्रकरणांत तपास यंत्रणा त्याचा शोध घेत होत्या. यामध्ये एनसीबीने नोंदवलेल्या दोन प्रकरणांचाही समावेश आहे. सुमारे ११५ कोटी रुपयांच्या अमली पदार्थ तस्करीत त्याचा सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात त्याच्या काही साथीदारांनाही तपाससंस्थांनी ताब्यात घेतले आहे.
“तपासात म्यानमारपासून मिझोराम, मणिपूर, आसाम, त्रिपुरा आणि बांगलादेशापर्यंत पसरलेल्या अत्यंत संघटित आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करी टोळीचे कार्य उघड झाले आले. या टोळीने विविध मार्ग, स्थानिक सहकारी, वाहतूक समन्वयक, हवाला चॅनेल आणि आर्थिक व्यवस्थापकांचा वापर करून मेथॅम्फेटामाइन आणि हेरॉइनची तस्करी केली,” असे एनसीबीने म्हटले आहे.
“या कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय पुरवठादार, वाहतूक समन्वयक, हवाला ऑपरेटर, वित्तपुरवठादार आणि स्थानिक वितरणाचे जाळे उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळाले असून सीमावर्ती भागांतील संघटित अमली पदार्थ तस्करीविरोधातील लढा अधिक मजबूत झाला आहे,” असेही एनसीबीने म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com