सिंहगड रस्ता : नऱ्हे-धायरी रस्त्यावरील पारी कंपनीजवळ (PARI Company) असलेल्या कचरा प्रकल्पाला (Waste Project) भीषण आग लागली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही..पहाटे अडीच-तीनच्या सुमारास धायरी येथील पारी कंपनीजवळील कचरा प्रकल्पाला आग लागली. आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाचे आनंदनगर केंद्र, नवले केंद्र, कात्रज, एरंडवणा येथील बंब बोलवण्यात आले. त्यानंतर पाण्याचे टँकर देखील बोलवण्यात आले..औरंगजेबाच्या थडग्याचं रूपांतर दर्गा अन् दर्ग्याचं रूपांतर मशिदीत झालंय, ती कबर काढून टाका; 'हिंदू एकता'ची निदर्शने.या ठिकाणी ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. त्यामुळे तेथे कचऱ्याचे खूप मोठे ढीग होते. आग विझवण्याचे काम अजूनही सुरू आहे. जेसीबी बोलून कचऱ्याचे ढीग काढून, तेथे आग विझवण्याचे काम सुरू असल्याचे आनंदनगर अग्निशमन केंद्राचे प्रमुख प्रभाकर उमराटकर यांनी सांगितले..या कचरा प्रकल्पाला लागून अनेक मोठे गृहप्रकल्प आहेत. मात्र, सुदैवाने आग पसरली नाही. ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलास यश आले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.