

Government decision to allocate land to PMRDA set to accelerate infrastructure growth in Pune district.
sakal
पुणे: शासनाच्या मालकीच्या असलेल्या पुणे जिल्ह्यातील एक हजार ८७८ हेक्टर म्हणजे चार हजार ६९५ एकर जमिनी पायाभूत सुविधा आणि प्रकल्पांसाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) विनामूल्य मिळणार आहे. या जमिनींचा वापर प्रकल्प उभारण्यासाठी अथवा त्या माध्यमातून प्रकल्पांसाठी आवश्यक तो निधी उभारण्यासाठी प्राधिकरणाला करता येणार आहे.