पुणे-सातारा महामार्गावर मोठी कोंडी; दहा किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

विजय जाधव 
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

पुणे-सातारा महामार्गावर मंगळवारी पहाटेपासून मोठी वाहतूकीची कोंडी झाली. आहे. जवळपास 10 किमीच्या वाहनांच्या रांगा लागल्या असून, पोलीस आणि प्रशासन वाहतूक सुरळीत करण्यात व्यस्त आहेत.

भोर(पुणे) : पुणे-सातारा महामार्गावर मंगळवारी पहाटेपासून मोठी वाहतूकीची कोंडी झाली. आहे. जवळपास 10 किमीच्या वाहनांच्या रांगा लागल्या असून, पोलीस आणि प्रशासन वाहतूक सुरळीत करण्यात व्यस्त आहेत.

महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील पुणे जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सारोळे(त.भोर) येथील नीरा नदी पासून ते खेड शिवापूर टोल नाक्यापर्यंत सुमारे दहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

पुण्याहून सातारा कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे. महामार्गावर पावसाचा जोर कायम आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Major traffic Jam on Pune Satara Highway