पिंपरीत भाजपची एकहाती सत्ता; राष्ट्रवादीला दणका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपने जोरदार मुसंडी मारत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. 32 प्रभागांतून 128 पैकी 78 जागा मिळवून भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. या निकालाने गेल्या वीस वर्षांपासून सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी चिंचवडकरांनी खुर्चीवरून खाली खेचले. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला 78, राष्ट्रवादीला 33, शिवसेनेला 8, मनसेला 1 आणि अपक्षांना 4 जागा मिळाल्या.

मुख्यमंत्र्यांची कुशल व स्वच्छ प्रतिमा आणि भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप,महेश लांडगे,खासदार अमर साबळे आणि ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांच्या संघटीत नेतृत्वाचे हे यश मानले जाते. राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या वीस वर्षांत केलेल्या शहराच्या विकासापेक्षा त्यांचा भ्रष्ट कारभार व गैरव्यवहारांचीच अधिक चर्चा झाली. त्यामुळे जनता पर्याय शोधत होती. केंद्रात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर त्यांनी जो कारभार केला, त्यावर जनतेने विश्‍वास ठेवला. पिंपरी चिंचवडचे प्रश्‍न भाजपचे सरकार मार्गी लावू शकते, असा विश्‍वास निर्माण झाल्यानेच जनतेने भाजपच्या पारड्यात दान टाकत भ्रष्टाचाराच्या विरोधात मतदान केल्याचे स्पष्ट झाले.
 
शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या वर्षभरापासूनच गळती लागली होती; ती रोखण्याचे अनेकदा अजित पवार यांनी प्रयत्न केले, मात्र त्याला अपयश आले. पवार यांच्याकडून वेळोवेळी दिलेली आश्‍वासने पाळली गेली नाही. अडीच-पावणे तीन वर्षांपूर्वी लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादीला राम-राम केला. त्यांनी भाजपमधून विधानसभा निवडणूक लढवून आमदारकी मिळवली. अलिकडे आमदार महेश लांडगे व आझम पानसरे यांनीदेखील राष्ट्रवादीला राम-राम ठोकला या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला आहे.

'विकासाला मत' या राष्ट्रवादीच्या प्रचाराला जनता बळी पडली नाही. त्यामुळे शहरात पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला. या गोष्टीचा राष्ट्रवादी काँग्रेसने अपप्रचार केला तोही जनतेला रुजलेला दिसत नाही. नोटाबंदीचे जनतेने स्वागत केले हे आजच्या निर्णयावरून स्पष्ट होते.

गेल्या काही वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसचा महापालिकेतील कारभार चव्हाट्यावर आला होता. वायसीएम रुग्णालयातील एचबीओटी मशीन खरेदी असो की गॅस शवदाहिनीचा घोटाळा; अगदी विठ्ठल-रुक्‍मिणी मूर्ती खरेदी गैरव्यवहार, एमआयडीसीतील साई उद्यानात केलेले अनधिकृत बांधकाम, सेक्‍टर 22 मधील पुनर्वनसन प्रकल्पातील बोगस लाभार्थी या सर्वांना जनता वैतागली होती.

Web Title: Majority for BJP in Pimpri; NCP shocked