तिळगूळ घ्या... गोड गोड बोला..

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

पिंपरी - ‘तिळगूळ घ्या... गोड गोड बोला’ असा स्नेहमय संदेश देत एकमेकांना तिळगुळाचे वाटप करीत पारंपरिक पद्धतीने मकर संक्रांत उत्साहात साजरी करण्यात आली. 

शनिवारी सकाळपासूनच प्रत्येकाच्या घरी पाहुण्यांची लगबग पाहावयास मिळाली. बालचमूंनी थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेत व मित्रांना तिळगूळ देत आनंद लुटला. नागरिकांनी, युवक- युवतींनी एकमेकांना एसएमएसद्वारे मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. शिवाय व्हॉट्‌सॲप, फेसबुक, ट्‌विटर अशा सोशल मीडियाद्वारेही संदेशांची देवाण-घेवाण झाली.

महिलांनी या दिवशी पारंपरिक पद्धतीने विशेष पोशाख परिधान केला होता. शहरातील चिंचवड, काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, पिंपरी, खराळवाडी, अजमेरा- मासुळकर कॉलनी, आकुर्डी, निगडी, भोसरी आदी परिसरांमधील विविध मंदिरांमध्ये संक्रांतीनिमित्त महिलांनी गर्दी केली होती. पूजेनंतर एकमेकींना वाण दिले.

पवनमावळात मकर संक्रांत उत्साहात 
सोमाटणे - पवनमावळात मकर संक्रांत सण उत्साहात साजरा करण्यात आला, महिलांनी ग्रामदैवतेच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती.मकर संक्रांत हा सण पवनमावाळातील सोमाटणे, शिरगाव, धामणे, गोडुंब्रे, गव्हुंजे, साळुंब्रे, सांगवडे, दारुंब्रे, कुसगाव, चांदखेड, पाचाणे, पुसाणे, डोणे, ओवळे, दिवड, आढले, परंदवडी, बेबडओहोळ, पिंपळखुंटे, शिवणे, मळवंडी, थुगाव, आर्डव, शिवली, भडवली, येलघोल, बऊर, ओझर्डे, सडवली, आढे, उर्से आदी गावांत उत्साहात झाला.

या वेळी महिलांनी आपापल्या ग्रामदैवतेच्या मंदिरात दर्शन घेऊन एकमेकांबद्दल स्नेहबंध व्यक्त करणारा ओवसण्याचा धार्मिक कार्यक्रम केला. साई मंदिर (शिरगाव), अमरजाई माता (शेलारवाडी), पद्‌मावती माता (उर्से, धामणे), वाघजाई माता (दारुंब्रे) येथील मंदिरात महिलांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

आंदर मावळात उत्साह
टाकवे बुद्रुक : ‘तिळ गूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत आंदर मावळात मकर संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. भोगीला हळदी कुंकवाचे लेणे देऊन महिला मंडळीनी या सणाची सुरवात केली. महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. टाकवे बुद्रुक, नवलाखउंब्रे, सुदुंबरे या बाजारपेठेतील गावातून शुभेच्छा व तिळगुळ वाटपासाठी गर्दी झाली होती. गावातील मंदिरात जाऊन अनेकांनी ‘श्री’चे दर्शन घेतले. 

Web Title: makar sankrant celebration