भिक्षेकऱ्यांना स्वावलंबी बनविण्याचा : डॉक्‍टर सोनवणे

भिक्षेकऱ्यांना स्वावलंबी बनविण्याचा : डॉक्‍टर सोनवणे

पुणे : डास पळविण्यासाठी औषधी क्रीम लावता तसं समाजातले वखवखलेले डास पळवून लावण्यासाठी मला गटारीतली घाण अंगाला लावावी लागत होती... हे बोल आहेत रस्त्यावर निराधार जगणाऱ्या एका अबलेचे. निमित्त होते पब्लिक ट्रस्ट प्रॅक्‍टिशनर्स असोसिएशनच्या दिवाळी फराळ कार्यक्रमात "डॉक्‍टर फॉर बेगर्स' अशी बिरुदावली धारण करणारे डॉ. अभिजित सोनवणे यांच्या अनुभव कथनाचे. 

वृद्ध निराधार भिक्षेकऱ्यांवर मोफत औषधोपचार करून स्वावलंबी जीवन जगण्याची प्रेरणा देणारे म्हणून डॉ. सोनवणे परिचित आहेत. येथील विभागीय सहधर्मादाय आयुक्त कार्यालयात अधिकारी, कर्मचारी व वकिलांच्या दिवाळी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. योग्य जागा मिळाल्यास प्लॅस्टिकवर पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारून भिक्षेकऱ्यांना स्वावलंबी बनविण्याचा मनोदय डॉ. सोनवणे यांनी व्यक्त केला. भिक्षेकऱ्यांच्या औषधोपचारासाठी धर्मादाय कार्यालयातील वकिलांनी सुमारे 40 हजार रुपयांचा निधी त्यांना सुपूर्त केला. 

वकील संघटनेने दिवाळी फराळ कार्यक्रमासोबत हा सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल सहधर्मादाय आयुक्त दिलीप देशमुख यांनी असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. मुकेश परदेशी यांच्यासह वकिलांचे कौतुक केले. धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप, सहायक आयुक्त राहुल चव्हाण, राणी मुक्कावार, उपाध्यक्ष ऍड. मोहन फडणीस, सचिव ऍड. हेमंत फाटे, विश्‍वस्त ऍड. शिवराज कदम जहागीरदार, ऍड. रजनी उकरंडे आदी या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com