दक्षिण आफ्रिकेतील 'मालावी हापूस' पुण्यात दाखल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

मार्केट यार्ड : दक्षिण आफ्रिकेतील मालावी येथील  हापूस आंबा बुधवारी (ता.१३) पुण्यातील मार्केट यार्डात दाखल झाला आहे. यामुळे कोकण हापूसच्या हंगामाअगोदरच ग्राहकांना हापूसची चव चाखायला मिळत आहे. घाऊक बाजारात तीन किलोच्या एक पेटिला १८०० ते २००० भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात एक पेटिला २००० ते २२०० भाव मिळत आहे. 

बाजार समितीतील आंब्याचे व्यापारी नाथसाहेब खैरे हे गेल्या दोन वर्षांपासून हा आंबा आयात करत आहेत. त्यांनी यावेळी सांगितले, फळ बाजारात ८०० पेट्याची आवक झाली आहे. यामध्ये एक पेटीमध्ये १० ते १६ अंबे असतात. एक पेटी साधारणतः ३ किलो आहे. पुणे बाजारात ८०० पेट्या, मुंबईत १७०० पेट्या आल्या आहेत. पुण्यातून हा आंबा अहमदाबादला, कोल्हापूर, सांगली तर मुंबईतून राजकोट, गुजरात, बेंगलोर आणि हैदराबाद येथे पाठविला जातो.

मालावी हापूस आंब्याचा हंगाम हा १५ ऑक्टोंबर ते डिसेंबरपर्यंत हा हंगाम सुरू असतो. परंतु यंदा देशात सतत पडणाऱ्या पावसामुळे हा आंबा उशिरा आयात करण्यात आला. कोकणातील हापूस आंब्या प्रमाणेच या आंब्याची रंग आणि चव तशीच असल्याचे खैरे यांनी सांगितले.

एका शेतकऱ्याने २०१३ला दापोली येथून हांबुस आंब्याचे कलम आफ्रिकेत मालवी येथे नेले होते. त्या ठिकाणी २५०० हेक्टरवर त्याची लागवड केली. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी त्याचे उत्पन्न सुरू झाले आहे. यंदा भारतात साधारणतः १०० टन आंब्याची अवाक अपेक्षित आहे. कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम साधारणतः डिसेंबरमध्ये सुरू होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malawi Hapus from South Africa to enter in Pune Market