Baramati News: दोन दिवसांच्या आंदोलनाला यश; माळेगावच्या सफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी लोकप्रतिनिधींनी केली गोड!

Malegaon Workers End Protest After Receiving Diwali Bonus: कंत्राटदाराकडून बोनस मिळेना; नगराध्यक्ष-नगरसेवक सरसावले, माळेगावच्या सफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!
Malegaon Nagar Panchayat Sanitation Workers Get Diwali Bonus After Two Day Protest and Support from Elected Representatives

Malegaon Nagar Panchayat Sanitation Workers Get Diwali Bonus After Two Day Protest and Support from Elected Representatives

esakal

Updated on: 

माळेगाव : माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) नगरपंचायतीच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना संबंधित कंत्राटदाराकडून दिवाळी बोनस मिळत नसल्याने सुरू असलेल्या दोन दिवसांच्या आंदोलनाची अखेर आज यशस्वी सांगता झाली. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत नगराध्यक्ष सुयोग सातपुते यांच्यासह नगरसेवकांनी स्वखर्चातून वर्गणी जमा करून दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतला. लोकप्रतिनिधींच्या या संवेदनशील पुढाकारामुळे सफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली असून, त्यांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.

Loading content, please wait...