

Malegaon Municipal Elections Scheduled for Tomorrow
Sakal
माळेगाव : माळेगाव बुद्रूक (बारामती) नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले. उद्या मंगळवार ( ता.२ ) रोजी मतदानाची आवश्यक ती तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उज्वला सोरटे यांनी दिली. माळेगाव नगरपंचायत निवडणूकीत नगराध्यक्षपदासह १८ जागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. यासाठी शहरात एकूण २२ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. या निवडणूकीत १८ हजार ७३० मतदार संख्या आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.