माळेगाव गोळीबार प्रकरण : हायकोर्टाकडून जयदीप तावरेच्या अटकेचे आदेश

पोलिसांच्या आजवरच्या तपास प्रक्रियेवर न्यायालयाचने ओढले ताशेरे
माळेगाव गोळीबार प्रकरण : हायकोर्टाकडून जयदीप तावरेच्या अटकेचे आदेश
माळेगाव गोळीबार प्रकरण : हायकोर्टाकडून जयदीप तावरेच्या अटकेचे आदेशsakal

माळेगाव : तत्कालिन तपासाधिकारी नारायण शिरगावकर यांनी माळेगावच्या रविराज तावरे गोळीबार प्रकरणात माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांचा सहभाग नाही, असा दिलेला अहवाल आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती संदीप के. शिंदे यांनी फेटाळला व पुण्याच्या मोक्का न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. प्रथमदर्शनी जयदीप तावरे यांच्याविरुद्ध गुन्ह्यात सहभाग असल्याचे पुरावे समोर आल्याने त्याचा सखोल तपास करण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय वरील प्रकरणाचे गंभीर स्वरूप विचारात घेता तपासाधिकारी तथा उपविभागीय पोलिस अधिकारी शिरगावकर यांनी पाहिजे तेवढ्या खोलवर तपास केला नसल्याचे निरिक्षणही उच्च न्यायालयाने नोंदविले.

माळेगाव गोळीबार प्रकरण : हायकोर्टाकडून जयदीप तावरेच्या अटकेचे आदेश
रेल्वेकडून बोनसची घोषणा, १२ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

सहाजिकच न्यायालयाच्या वरील आदेशामुळे पोलिसांना तात्पुरत्या जामिनावर सुटलेल्या जयदीप यांना पुन्हा अटक करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले. विशेषतः न्यायालयाच्या या दणक्याने पोलिस प्रशासनासह जयदीप यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तावरेंचे दोन्ही गट हे राष्ट्रवादीचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मानणारे असल्याने या प्रकरणातील गुंतागुंत हा तालुक्यातला चर्चेचा विषय ठरला आहे. माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) येथील राष्ट्रवादीचे कार्य़कर्ते रविराज तावरे गोळीबार प्रकरणात माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांचा सहभाग नाही, असा बारामतीचे तत्कालिन उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी २१ जुलै रोजी दिलेला अहवाल मोक्का न्यायालयाचे न्यायमुर्ती जी. पी. आगरवाल यांनी फेटाळला होता.

शिवाय तात्पुरत्या जामिनावर सुटलेल्या जयदीप यांनी शरण यावे व १८ आॅगस्ट रोजी त्याला न्यायालयात हजर करावे, असे आदेश न्यायाधिश आगरवाल यांनी पोलिसांना दिले होते. दरम्यानच्या कालावधीत या निर्णया विरुद्ध जयदीप तावरे हे मुंबई उच्च न्यायालयात गेले असता संबंधित न्यायालयाचे न्यायमुर्ती संदीप के.शिंदे यांनी मोक्का न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. शिवाय पोलिसांच्या आजवरच्या तपास प्रक्रियेवर चांगलेच ताशेरे ओढले. उच्च न्यायालयात रविराज यांच्या बाजूने अॅड. मनोज मोहिते यांचा युक्तवाद न्यायालयात महत्वपुर्ण ठरला, तर जयदीप यांच्यावतीने अॅड. हार्षद निंबाळकर यांनी बाजू मांडली. दुसरीकडे, जामिन नाकारलेले जयदिप तावरे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णायाविरुद्ध सर्वेच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे.

माळेगाव गोळीबार प्रकरण : हायकोर्टाकडून जयदीप तावरेच्या अटकेचे आदेश
IPL 2021, RCB vs SRH : जेसन-केन जोडी फुटली; हर्षल पटेलला यश

दरम्यान, माळेगाव येथे ३१ मे रोजी रविराज तावरे यांच्यावर जीवघेणा गोळीबार झाला होता. त्या प्रकरणी येथील प्रशांत पोपटराव मोरे, टाॅम उर्फ विनोद पोपटराव मोरे, राहुल उर्फ रिबेल कृष्णांत यादव व एका अल्पवयीन मुलावर खुन करण्याचा प्रयत्न करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता. परंतु संबंधित आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेवून पोलिसांनी त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली होती. दरम्यानच्या कालावधीत रविराज रुग्णालयात उपचार घेताना त्यांनी पोलिसांना जयदीप तावरे गोळीबाराच्या कटात सहभागी असल्याचा जबाब दिला होता. या जबाबाच्या आधारे पोलिसांनी जयदीप यांच्यावर कटात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल करीत अटक केली होती.

अर्थात मोक्कांतर्गत जयदीप विरुद्ध कारवाई झाल्याने त्यावेळी गावात तणाव निर्माण झाला होता. जयदीप यांच्या समर्थनार्थ गाव बंद ठेवून निषेध सभा घेण्यात आली होती. रविराज यांनी राजकीय हेतूने जयदीप यांना गोवल्याचा आरोप करीत तसे निवेदन पोलिसांना देण्यात आले होते. पोलिसांनीही त्यानुसार गुन्ह्याची चौकशी केली असता जयदीप यांचा या प्रकरणी संबंध नसल्याचा अहवाल २१ जुलै रोजी मोक्का न्यायालयात सादर केला होता. परंतु मोक्का न्यायालयापुढे रविराज यांच्या वकिलांनी तपासातील काही अक्षेपार्य़ बाबी निदर्शनास आणून दिल्या. त्यानंतर त्यांनी पोलिसांचा अहवाल अमान्य करीत जयदीपला त्वरित अटक करण्याचे आदेश दिले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com