balasaheb taware
balasaheb taware

अजितदादांच्या सूचनेनुसार माळेगावच्या अध्यक्षांनी मांडला विरोधकांचा लेखाजोखा 

माळेगाव (पुणे) : अजितदादांच्या नेतृत्वाखाली माळेगाव साखर कारखान्याने राज्यात विक्रमी ऊस दर दिला. ४ हजार टन क्षमता असताना कारखान्याने (सन २०१४-१५) ९ लाख टन अधिकचे गाळप केले. परंतु, विरोधक चंद्रराव व रंजन तावरे यांनी १९३ कोटींची भांडवली गुंजवणूक केली व कारखान्याच्या झालेल्या विस्तारिकरणातून साडेनऊ लाख टन गाळपाचा टप्पाही पूर्ण करता आला नाही. रिकव्हरी लाॅस, डिस्टलरी व विजेचे उत्पन्न निम्म्याने घटल्याने कोट्यवधीचे नुकसान झाले. सुमारे २३७ कोटी साखर पोत्यावरील उचलीसह ५८७ कोटींचे कर्ज रेकाॅर्डच्या आधारे आधिकारीच ठामपणे सांगत असताना विरोधकांनी आतातरी खोटारडेपणा सोडावा, असे खडे बोल सुनावत कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी विरोधकांचा कारभार चव्हाट्यावर आणला. 

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्यांनी नाहक आमची बदनामी थांबवावी, रंजन तावरे यांच्या कारकीर्दीत कारखान्याची अर्थिक स्थिती मजबूत होती, असा दावा ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे यांनी केला होता. त्याचे पडसाद कारखाना कार्यक्षेत्रात उमटले होते. त्याची दखल खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. तसेच, त्यांनी कारखाना प्रशासनाला या संबंधीची खरी वस्तूस्थिती काय आहे, ते सभासदांना देण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी पत्रकारांशी बोलताना विरोधकांच्या कामकाजाचा लेखाजोखाच मांडला. या वेळी उपाध्यक्ष तानाजी कोकरे, संचालक अनिल तावरे, योगेश जगताप, स्वप्नील जगताप उपस्थित होते. 

अध्यक्ष तावरे म्हणाले की, कोणत्याही धंद्याची अर्थिक स्थिती चांगली असेल, तर कर्जाची भिती वाटत नाही. परंतु, मागिल संचालक मंडळाने कोट्यवधी रूपये खर्चून विस्तारिकनापोटी कारखाना साडेसात हजार टन क्षमतेचा केला. डिस्टलरीचे आधुनिकीकरण झाले. परंतु, टोटल लाॅसेसच्या चक्रावणाऱ्या नोंदी पाहिल्यानंतर फायदा तर सोडाच, पण अर्थिक नुकसानीचे आकडे माळेगावच्या इतिहासात कधीही पाहण्यात आले नव्हते.  राहिला प्रश्न गतवर्षी प्रतिटन ३४०० रुपये दर दिल्याचा. तोडणी वाहतुकीसारख्या नियमित कर्जातील कोट्यवधी रुपये भावाच्या रुपाने वाटण्याचा प्रताप विरोधकांनी केला. या अघोरी गोष्टींना अधिकाऱ्यांचा विरोध होता. परंतु, सत्तेपुढे कोणाचेच काहीही चालले नाही आणि कारखाना अर्थिकदृष्ट्या अडचणीत आला. त्या उलट राष्ट्रवादीच्या ताब्यात ४ हजार टनी कारखाना असताना साडेपाचशे ते १८९० पर्यंत प्रतिटन एफआरपीपेक्षा अधिकचा ऊस दर दिल्याच्या नोंदी अहवालात आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अध्यक्षांचे लक्षवेधी मुद्दे 
कारखान्याला ३१ मार्च २०२० अखेर १६२ कोटी अधिक व्याज, अशी देणी आहेत. चार हजार टन क्षमता असताना ९ लाख टन गाळप झाले, परंतु विरोधकांच्या काळात साडेसात हजार टन क्षमता करूनही केवळ साडेनऊ लाख टन ऊस गाळप झाले, माळेगावची एफआरपीपेक्षा अधिक ऊस दर देण्याची परंपरा आहे. त्यामुळे विरोधकांनी काहीही वेगळे केले नाही. गतवर्षी सोमेश्वर कारखान्याच्या तुलनेत माळेगावचे साखर उताऱ्यातील लाॅसमुळे ३६ कोटी ४३ लाखाचे नुकसान, तर वीजनिर्मिती घटल्याने १६ कोटीचे नुकसान झाले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com