

तीन कर्मचाऱ्यांवर जिल्हा बँकेचा कारभार
माळीनगर शाखेत खातेदारांची गैरसोय; व्यवहारांसाठी ताटकळत बसण्याची वेळ
सकाळ वृत्तसेवा
लवंग, ता. १९ : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माळीनगर शाखेत गेल्या महिनाभरापासून शिपायासह केवळ तीन कर्मचारी कार्यरत असल्याने खातेदारांना वेळेत सेवा मिळत नाही. व्यवहारांसाठी ताटकळत बसावे लागत असल्याने खातेदारांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
माळीनगर शाखा तालुक्यातील नावाजलेली शाखा म्हणून ओळखली जाते. येथील साखर कारखाना, पतसंस्था, विकास सोसायट्या, मॉडेल हायस्कूलमधील शिक्षक, व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांची खाती या शाखेत आहेत. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची बचत खातीही येथे आहेत. त्यामुळे शाखेत दररोज पैशांची देवाणघेवाण करण्यासाठी मोठी गर्दी असते.
सध्या शाखाधिकारी, लिपिक, कॅशिअर आणि शिपाई अशा चार पदांवर कामकाज सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात गेल्या महिनाभरापासून केवळ तीन कर्मचारी बँकेचे व्यवहार सांभाळत आहेत. त्यामुळे मोठ्या रकमेची मागणी केल्यानंतर ती वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी, खातेदारांचे आर्थिक नियोजन कोलमडत आहे.
या शाखेत अनेक संस्थांच्या मोठ्या ठेवी आहेत. मुदत ठेवींचे नूतनीकरण, शिक्षकांचे वेतन, कारखान्यातील कामगारांचे व्यवहार, व्यापारी व व्यावसायिकांची चालू खाती, बचत खाती आणि कॅश क्रेडिटचे व्यवहार दररोज होतात. मात्र, कर्मचारी कमी असल्याने या सेवांनाही विलंब होत आहे. विशेषतः वेतन जमा झाल्यानंतर पैसे काढण्यासाठी येणाऱ्या शिक्षकांना बराच वेळ थांबावे लागत आहे.
कोट
- बँकेने या शाखेत कर्मचारी भरती केली नाही. कंत्राटी पद्धतीने भरती केली जाते. महिनाभर आम्ही फक्त तीन कर्मचारीच बॅंक व्यवहार चालवतो. कर्मचारी कमी असल्याने सेवा देण्यासाठी वेळ लागतो.
- मुकुंद वजाळे, शाखाधिकारी, माळीनगर शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.