

हेड
ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल
सबहेड
कोलकता पोलिसांकडून कारवाई
रस्त्याची एक बाजू अडविल्याचा दावा
कोलकता, ता.२९ (वृत्तसंस्था) ः तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्यावतीने आयोजित रॅलीदरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडल्या आहेत. कोलकता पोलिसांनी त्यांच्या वक्तव्याची स्वतःहून गंभीर दखल घेत खटला दाखल केला आहे. कोलकता उच्च न्यायालयाने ममतांना या रॅलीदरम्यान मैदानाची एक बाजू रिकामी ठेवण्याचे निर्देश दिले होते पण त्यांनी नियमांचे पालन केले नसल्याचे उघड झाले आहे. उच्च न्यायालयाने या सभेसाठी वेळेची मर्यादा देखील घालून दिली होती पण त्या अटीचेही उल्लंघन करण्यात आले आहे. या प्रकरणी हास्टिंग पोलिस ठाण्यामध्ये ममता बॅनर्जी आणि कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सभेमध्ये बोलताना ममतांनी तृणमूल काँग्रेसच्या राजवटीमध्ये पोलिसांना एक मानवी चेहरा होता, असे म्हटले होते पण भाजपच्या राजवटीमध्ये त्याचे स्वरूप राक्षसी झाल्याचे नमूद केले होते. आपल्या कार्यकर्त्यांवरील पोलिसांचा अत्याचार थांबवून दाखवू, असे त्यांनी म्हटले होते. हीच आपली रक्षाबंधनाची भेट असेल, असा दावाही त्यांनी केला होता.
निवडणूक हायजॅक केली ः ममता
‘‘ पश्चिम बंगालमध्ये भाजप फसवणुकीचे राजकारण करत असून लोकांमध्ये भीती पसरविण्याचे काम सुरू आहे. आपल्या सभांना परवानगी देण्यात आली नाही तर आपण स्वतः रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू. निवडणूक आयोगाला ताब्यात घेऊन भाजपने मागील विधानसभा निवडणूक हायजॅक केली होती,’’ असे त्यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.