बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाला 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

गुरुवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास आरोपीने त्याच्या पायातील बेड्या कशाच्या तरी साहाय्याने काढून टाकल्या. त्यानंतर आरोपी फिर्यादीच्या कायदेशीर रखवालदारीमध्ये असताना तेथून पळून गेला.

पुणे : अपहरण, बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पॉस्को) गुन्ह्यात अटक केलेला आरोपी पायातील बेड्या काढून पोलिस ठाण्यातून पळाला. हा प्रकार गुरुवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास अलंकार पोलिस ठाण्याच्या तपास पथकाच्या कक्षात घडला. 

अजय गणेश चव्हाण (वय 19, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध अपहरण, बलात्कारासह पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल होता. त्यास अलंकार पोलिसांनी बुधवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास अटक केली होती. त्यानंतर त्यास पोलिस नाईक सचिन बुधावले यांच्या ताब्यात दिले होते. बुधावले यांनी त्याच्या पायात बेड्या घालून त्यास पोलिस ठाण्याच्या तपास पथकाच्या कक्षात ठेवले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, गुरुवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास आरोपीने त्याच्या पायातील बेड्या कशाच्या तरी साहाय्याने काढून टाकल्या. त्यानंतर आरोपी फिर्यादीच्या कायदेशीर रखवालदारीमध्ये असताना तेथून पळून गेला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रताप साळवी करीत आहेत.

पुणे : भिडे पुलावर सेल्फी घेणारे दोघे नदीत पडून वाहून गेले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man arrested in case of rape escape from custody