
येरवडा चौकात बड्या बापाच्या पोराने लघुशंका केल्याचं प्रकरण ताजं असताना आता पुन्हा एक असाच प्रकार समोर आलाय. धक्कादायक म्हणजे लघुशंका केल्याचा जाब विचारल्या प्रकरणी पती-पत्नीवर तिघांनी कोयत्यानं वार केले आहेत. या प्रकरणी तिघांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एडी भाईच्या मुलानं हे कृत्य केलं असल्याची माहिती समोर येतेय.