esakal | 'तू मला हवी आहेस' म्हणत तयार केला अश्लिल ऑडिओ अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

a man black mails a lady through vulgar photo and Videos

महिलेचे अश्‍लील फोटो व ऑडिओ क्‍लीप तयार करून तिच्या पतीच्या मोबाईलवर पाठविली. यासह महिलेचा पाठलाग करीत विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'तू मला हवी आहेस' म्हणत तयार केला अश्लिल ऑडिओ अन्...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महिलेचे अश्‍लील फोटो व ऑडिओ क्‍लीप तयार करून तिच्या पतीच्या मोबाईलवर पाठविली. यासह महिलेचा पाठलाग करीत विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय कुमार वसवणार ट्रान्सजेंडर्ससाठी घरं!

सुरेश किसन मेश्राम (रा. हुलसुर, जि. बिदर, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

आरोपीने फिर्यादी महिलेच्या पतीच्या मोबाईलवर फोन केला. "तु मला हवी असून मला तुझ्याबरोबर लग्न करायचे आहे, तु तुझ्या नवऱ्याला व लेकरांना सोडून माझ्यासोबत रहायला ये', असे तो म्हणाला. यासह आरोपीने अश्‍लील फोटोवर फिर्यादी महिलेचा चेहरा जोडून हा फोटो फिर्यादी महिलेच्या पतीच्या मोबाईलवरील व्हॉटसऍपवर पाठविला. यासह फिर्यादी विषयी अश्‍लील बोलून त्याबाबतची ऑडीओ क्‍लीपही पाठविली. त्यानंतर फिर्यादीचा पाठलाग करून विनयभंग केला. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image