
पुणे : त्याला कोणीतरी मारण्यासाठी येत असल्याचा भास होत होता, त्याच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू होते. दरम्यान, हाताला काम मिळावे म्हणून तो पुण्यात आला. इथेही पुन्हा तोच प्रकार. 20 ऑगस्ट रोजी मध्यरात्री पावणे एक वाजता तो धावतच एका बंगल्यात घुसला, "मला वाचवा, मला मारण्यासाठी इनोव्हातुन लोक आले आहेत, असे म्हणत तो किचनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करु लागला. त्यावेळी चोर समजून घरातील लोकांनी त्याला खिडकीतुन बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो खाली पडला, गंभीर जखमी झाला आणि अखेर त्याचा जीव गेलाच !
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तुम्हाला वाटेल हा एखाद्या चित्रपटातील प्रसंग आहे. पण नाही, ही पुण्यात घडलेली खरी घटना आहे. त्यामध्ये रामकिशन देविदास सुरवसे (वय 26, रा. हलकी, ता. शिरुर, अनंतपाळ, लातुर) असे मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. रामकिशन सुरवसे हा तरुण गावी असताना त्यास कोणीतरी मारायला आल्याचा भास होत होता. त्यामुळे त्याच्यावर लातुरच्या प्रेरणा रुग्णालयात उपचार सुरू होते. 18 ऑगस्ट रोजी तो हाताला काम मिळेल म्हणून पुण्यात आला होता. तो त्याच्या नातेवाईकांकडे राहात होता. 20 ऑगस्ट रोजी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास रामकिशनला पुन्हा तोच भास होऊ लागला. त्यामुळे घाबरुन तो वडगाव शेरी येथील बॉम्बे सॅपर्स कॉलनी येथील एका बंगल्याच्या आवारामध्ये घुसला. त्यावेळी तो "वाचवा, वाचवा मला मारण्यासाठी इनोव्हा गाडीतुन लोक आले आहेत.' असे ओरडत तो बंगल्याच्या व्हरांड्यात आला. घाबरलेल्या अवस्थेतच त्याने व्हरांड्यातील सोफ्यावर चढून देखाव्यासाठी भिंतीला टांगलेले पितळी बिगुल घेऊन त्याने बंगल्याच्या किचनची काच फोडली. त्यानंतर तो घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागला.
वाघोलीतील विकासकामांना निधी द्या; वाचा, कोणी केली मागणी?
एव्हाना, बंगल्यातील कुटुंबही जागे झाले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोर किचनवाटे घरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे संबंधीत कुटुंबाला वाटले. तो तेथून निघून जावा, या उद्देशाने घरातील काही जणांनी भरीव लाकडी बांबूच्या सहाय्याने त्याला किचनच्या खिडकीतुन बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यास बांबुचा मार बसल्याने, त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी गंभीर जखमा होऊन त्याचा मृत्यु झाला. या सगळ्या प्रकरणाचा चंदननगर पोलिसांकडून काही दिवसांपासून तपास सुरू होती. चौकशी पुर्ण झाल्यानंतर याप्रकरणी संबंधीत व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश पासलकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.