

Man-Eater Leopard Fear Returns to Bhimashankar Region
Sakal
मंचर : भीमाशंकरची सावली पुन्हा जुन्नर–शिरूर–आंबेगाववर, भीती ही नवीन नाही. फक्त तिचा भौगोलिक नकाशा बदलला आहे. आज जुन्नर, शिरूर आणि आंबेगाव तालुक्यांत बिबट्याच्या दहशतीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. निष्पाप लहान मुले, महिला आणि नागरिक नरभक्षक बिबट्याचे बळी ठरत आहेत. शाळेचा रस्ता असुरक्षित झाला आहे, शेतीत जाणे धोक्याचे झाले आहे आणि रात्रीची शांतता भयकथेप्रमाणे थरकाप उडवणारी बनली आहे.