दोन पुलाच्यामधून पडलेल्या युवकास हेल्मेटमुळे मिळाले जीवदान 

man s life save due to helmet during the accident
man s life save due to helmet during the accident

वारजे माळवाडी (पुणे) : दुचाकीची पुलाच्या कठड्याला धडकून दोन पुलाच्या मधून ओढ्यात पडलेल्या युवकास हेल्मेट घातल्यामुळे जीवदान मिळाले आहे.

वारजे माळवाडी येथील वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक विवेकानंद वाखारे यांनी सांगितले की, या अपघातातील युवक रविराज वडणे (वय 24, रा. सिंहगड रस्ता) हा युवक किमान 20 फुटवरून खाली पडला. तो धडकताना गाडीच्या वेगानुसार तो खाली सिमेंटच्या कट्टा त्यावर तो पडला. यामध्ये डोक्याला व पायाला मार लागलेला आहे. अपघात घडला त्यावेळी, त्याच्या डोक्यात हेल्मेट असल्यामुळे तो वाचला. असे वाखारे यांनी सांगितले. 

रात्री दुचाकीचा अपघात झाल्याची माहिती नियंत्रण वारजे पोलिसांनी मिळाली. त्यावेळी रात्र पाळीचे अधिकारी पोलिस उपनिरिक्षक प्रविण प्रकाश भोपळे, रामनगर मार्शल रमेश क्षीरसागर, बाळासाहेब शिरसाठ, राहुल मोरे व वाहतूक विभागाचे कर्मचारी डोंगरसिंग महाले, दिनेश सोनवणे यांना तीन वाजता पुलाजवळ गाडी दिसली. पाऊस जोरात पडत होता. पुलाखाली जोराने पाणी वाहत होते. दुचाकी चालक न दिसल्याने त्याला कोणीतरी दवाखान्यात नेले असेल. असे वाटले शंका म्हणून त्यांनी दोन्ही पुलाच्यामधून खाली पाहिले आवाज दिला परंतु प्रतिसाद मिळाला नाही. ते परत गेले. 

पोलिसांनी शुक्रवारी सकाळी उजाडल्यावर ते पुन्हा घटनास्थळी आले त्यावेळी, ओढ्याचे पाणी कमी झाले होते. त्यांना ओढ्याच्या पाण्यालगत पुलाच्या पायाचा कट्टा त्यावर एकजण जखमी अवस्थेत दिसला. ते सर्वजण खाली ओढ्यात उतरले. त्यांनी ओढ्याचे पाणी चिखल उतारावरील निसरडा रस्ता असताना वाहतूक पोलिस डोंगरसिंग महाले याने त्याला खांद्यावर उचलून आणले. जखमी असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गाडीतील डीक्कीत त्याची कागदपत्रे होती त्यावरून त्याचे नाव सापडले त्याच्या नातेवाईकांना बोलविले. 

पोलिसांनी ओढ्याकडे जाताना उतार चिखलातून पोलिसांनी त्याला मोठ्या कौशल्याने बाहेर काढला. असे पोलिस  निरीक्षक प्रकाश खंडाळकर यांनी सांगितले. त्याबद्दल वारजे कर्वेनगर परिसरात पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. 

दरम्यान, अशाच प्रकारची घटना मागीलवर्षी देखील याच ठिकाणी घडली होती. त्यात ही दुचाकी धडकून येथे अपघात घडला होता. त्यादुचाकी चालक ओढ्यातील गाळात अडकला होता. त्यात चालकाचा मृत्यू झाला होता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com