esakal | पुणे : अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप

बोलून बातमी शोधा

Crime_Rape

पीडित मुलीच्या आईचे निधन झाले आहे. तर तिचे वडील मनोरुग्ण असल्याने ते घरातून निघून गेले आहेत. त्यामुळे ८० वर्षाची आजी तिचा सांभाळ करीत आहे.

पुणे : अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : आजीकडे राहत असलेल्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार करणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीला न्यायालयाने जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांनी हा निकाल दिला. याबाबत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने पिंपरी-चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मार्च ते डिसेंबर २०१६ दरम्यान हा प्रकार घडला.

कात्रज घाटात पुन्हा वणवा; अग्निशमनच्या दोन गाड्यांसह वन विभागाचे शर्थीचे प्रयत्न​

पीडित मुलीच्या आईचे निधन झाले आहे. तर तिचे वडील मनोरुग्ण असल्याने ते घरातून निघून गेले आहेत. त्यामुळे ८० वर्षाची आजी तिचा सांभाळ करीत आहे. आरोपी हा आजीच्या घरी गेल्या १० वर्षांपासून भाडेकरू म्हणून राहत होता. खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकील सुनील हांडे यांनी पाहिले. खटल्यात त्यांनी सहा साक्षीदार तपासले. गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक रत्ना सांवत यांनी केला. त्यांना पोलिस कर्मचारी गंगाधर नाईकरे आणि पोलिस हवालदार सुषमा पाटील यांनी मदत केली. त्रास होऊ लागल्याने मुलीची तपासणी केल्यावर ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तुझा गर्भपात करू, असे आरोपीने मुलीला सांगितले.

पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई; भारतीयांचे वाचविले तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये!​

त्यानंतर काही दिवसांनी पोटामध्ये जास्त दुखू लागल्याने पीडित मुलीने आरोपीला फोन केला. माझे नाव न घेता कोणाचे तरी नाव घेऊन आजीला घेऊन दवाखान्यात जा, असे त्याने सांगितले. त्यानंतर मुलीने घडलेला सर्व प्रकार आजीला सांगितला. आजीने मुलीला दवाखान्यात दाखल केले होते. त्यावेळी मुलीने एका मुलाला जन्म दिला होता. ते बाळ एका संस्थेकडे सुपूर्त करण्यात आले आहे. आरोपी हा पीडित मुलीशी विवाह करण्यासाठी तयार होता. मात्र दोघांच्या वयातील अंतर, आरोपीने पीडित मुलीचा घेतलेला गैरफायदा लक्षात घेता न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

पुणे : पिस्तुलाचा धाक दाखवत वेगळं राहणाऱ्या पत्नीवर पतीचा बलात्कार​

घर घेऊन देण्याचे दाखवले आमिष :
आरोपी हा ड्रायव्हर आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्य हे गावीच राहात होते. कामावरून आल्यावर तो अंथरूण घेण्याच्या बहाण्याने घरात येऊन मुलीला टेरेसवर घेऊन जात असे. ‘मी तुला सांभाळतो, तुला घर घेऊन देतो, तुझं लग्न लावून देतो’ असे सांगून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार करत होता.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा