Gangster Gaja Marne : तुरुंगात असलेल्या गुंड गजा मारणेसाठी बिर्याणी ऑर्डर करणाऱ्या एका तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं बुधवारी कोथरुड इथून अटक केली. हा तरुण मारणे टोळीचा सदस्य असल्याचा पोलिसांना संशय आहे. या तरुणाला अटक केल्यानंतर त्यानं मारणेला कशी मदत केली याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. यावरुन गुंड मंडळी तुरुंगात पोलिसांच्या ताब्यात असतानाही कशी बाहेरुन सुत्र चालवतात याचा हा एक प्रकारे पुरावाच असल्याचं बोललं जात आहे.