
पुणे : मोबाईल चॅटींगद्वारे ओळख झालेल्या तरुणाला समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी एकांतात भेटण्यास गेलेल्या विवाहित व्यक्तीला चांगलाच चोप देऊन त्यास लुटल्याची घटना धायरी परिसरात नुकतिच घडली होती. या बातमीने अनेकांना धक्का बसला, तसाच "त्या' व्यक्तीबद्दल सहानुभूतीही व्यक्त केली जात होती. पोलिसांनी देखील ही घटना जरा जास्तच मनावर घेतली आणि या कटाच्या मुख्य सूत्रधाराला बेड्या ठोकल्या. जतिन संतोष पवार (वय 18, रा. महादेवनगर, टकले चाळ, चारवाडा चौक, मांजरी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
याप्रकरणी 34 वर्षीय व्यक्तीने सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. विवाहित व्यक्तीची "ग्राईडर गे अॅप' या मोबाईल अॅपद्वारे रवी नावाच्या एका तरुणाशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात चॅटिंग सुरू झाले. दरम्यान, त्यांच्यात समलैंगिक संबंध ठेवण्याचे निश्चित झाले. त्यानुसार ते नऊ ऑगस्ट रोजी ते नांदेड परिसरातील चव्हाणनगर भागातील एका खोलीमध्ये भेटले. त्यावेळी तेथे रवीसह अन्य तिघेजण आले. त्यांनी फिर्यादीला लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. त्यानंतर तलवारीचा धाक दाखवून त्याच्याकडील सोन्या चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले होते. दरम्यान, या घटनेमुळे फिर्यादी घाबरले होते. त्यांनी हा प्रकार त्यांच्या मित्रास सांगितल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यास सांगितले होते. त्यानुसार, सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, या घटनेची गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने गांभीर्याने दखल घेत आरोपींचा शोध सुरू केला. त्यावेळी संबंधित गुन्ह्यातील एक आरोपी अप्पर इंदिरानगर येथील चहाच्या टपरीजवळ येणार असल्याची खबर पोलिस कर्मचारी सचिन जाधव यांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, हनुमंत शिंदे, पोलिस कर्मचारी सचिन जाधव, संजय बरकडे, प्रशांत गायकवाड, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, बाबा चव्हाण यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी अप्पर इंदिरानगर येथील बसथांब्याजवळ सापळा रचला. त्यानंतर तेथे संशयितरीत्या फिरणाऱ्या तरुणास ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर त्याने त्याचा साथीदार महेश वारभुवन व अन्य साथीदारांसह पूर्व नियोजित कट रचल्याचे मान्य केले. तसेच या गुन्ह्याचा तो मुख्य सूत्रधार असल्याचे कबूल केले. त्यास पुढील तपासासाठी सिंहगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
"त्या'साठी गुगल पे द्वारे घेतले 61 हजार रुपये !
फिर्यादीने "ग्राईडर गे अॅप'द्वारे तरुणाची ओळख झाल्यानंतर समलैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर फिर्यादीने रवी नावाच्या तरुणाला गुगल पे द्वारे 61 हजार रुपये पाठविले होते. तर प्रत्यक्षात त्यास भेटल्यानंतर व फिर्यादीस मारहाण केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीला तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने असा 81 हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.