नऱ्हेतील पदाधिकारी शिवसेनेत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

खडकवासला - नऱ्हे येथील मानाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ कुटे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण कुटे, ग्रामपंचायत सदस्या ललिता अनिल कुटे, सुनील वाल्हेकर, सुनीता कुटे यांनी समर्थकांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

बारामती लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख सत्यवान उभे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. जिल्हाप्रमुख दत्तात्रय टेमघरे, उपजिल्हा प्रमुख रमेश कोंडे, हवेली खडकवासला तालुकाप्रमुख नितीन वाघ, पंचायत समिती सदस्य दादा ऊर्फ सोमनाथ कोंढरे, उपजिल्हा प्रमुख अमोल हरपळे, वेल्हा तालुकाप्रमुख व पंचायत समिती सदस्य राजेश निवंगुणे, हवेली तालुकाप्रमुख संदीप मोडक, युवा सेना जिल्हाप्रमुख सचीन पासलकर, उपजिल्हाप्रमुख अनिल मते, भारतीय विद्यार्थी सेना हवेली तालुका संघटक दत्तात्रेय रायकर, युवा सेना उपशहरप्रमुख महेश पोकळे आदी उपस्थित होते.

Web Title: Manaji Prasishthans officers entered in Shivsena