मंचरच्या माजी विद्यार्थ्यांचा पूरग्रस्तांसाठी "एक हात मदतीचा'  

school.jpg
school.jpg

निरगुडसर(पुणे) :  दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आंबेगाव व शिरूर तालुक्‍यातील 150 मित्र-मैत्रिणींनी एकत्रित येत डिग्रज (जि. सांगली) येथील पूरग्रस्त भागातील 9 बालवाडी व 5 प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सुमारे दीड लाख रुपयांचे शालेय साहित्य मदत स्वरूपात दिले. या सर्व मित्रांनी हा सामाजिक उपक्रम राबवत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. 

आंबेगाव व शिरूर तालुक्‍यातील विविध गावातील विद्यार्थ्यांनी 1996 ते 2001 या काळात मंचर येथील अण्णासाहेब आवटे कॉलेजच्या कला शाखेच्या बॅचमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यानंतर अनेक जण विविध नोकरी - कामानिमित्ताने बाहेरगावी आहेत. या बॅचचे मित्र - मैत्रीण एकत्र आले आणि त्यांनी सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एक मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला. डिग्रज (जि. सांगली) येथील पूरग्रस्त भागातील 9 बालवाडी व 5 प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मदत स्वरूपात दिले. शालेय साहित्यामध्ये दप्तर, मण्यांची पाटी, बॉल पेन्सिल, बसकर पट्टी, पेन बॉक्‍स, खडू, इतर प्रकारचे साहित्य समाविष्ट होते. "एक हात मदतीचा' या योजनेत हे सामाजिक काम करण्यात आल्याची माहिती सातारा वनाधिकारी प्रशांतकुमार पडवळ यांनी दिली. 

वनाधिकारी प्रशांतकुमार पडवळ यांनी शालेय विद्यार्थ्यांना 150 हॉलीबॉल देऊन त्यांच्या शारीरिक विकासासाठी मदत केली. डिग्रज येथे विद्यार्थ्यांना विविध भेट देण्याप्रसंगी प्रशांतकुमार पडवळ, प्रशांत बागल, प्रदीप डोके, नितीन थोरात, बळिराम थोरात, राहुल जगदाळे, प्रशांत शिंदे हे उपस्थित होते. ग्रामपंचायत डिग्रजमध्ये हा कार्यक्रम झाला. शालेय साहित्याची मदत पाहून विद्यार्थी भारावून गेले होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. प्रशांत बागल व प्रशांतकुमार पडवळ यांनी मनोगत व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com