Bullock Cart Competition : बैलगाडा शर्यतीच्या घाटात गाडा जुपत असताना बैलाने काढला पळ

बैलगाडा शर्यतीच्या घाटातून गाडा जुपत असताना सोन्या बैलाने तेथून पळ काढला.
Sonya Bull
Sonya BullSakal
Summary

बैलगाडा शर्यतीच्या घाटातून गाडा जुपत असताना सोन्या बैलाने तेथून पळ काढला.

मंचर - मंचर (ता. आंबेगाव) येथील ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त सोमवारी (ता. २४) आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या घाटातून गाडा जुपत असताना सोन्या बैलाने तेथून पळ काढला. सर्वत्र शोध घेतला पण सोन्या अजून मिळाला नाही. सोन्याच्या मालकाने थेट मंचर पोलीस ठाण्यात जाऊन सोन्या बैल हरवला असल्याची फिर्याद दाखल केली आहे. त्यामुळे मंचर पोलीसही सोन्याला शोधण्यासाठी अलर्ट झाले आहेत. सोन्या हरविल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली असून अन्य अनेक बैलगाडा मालकांनी सोन्याची शोध मोहिम सुरु केली आहे.

सोन्या बैलाचे मालक अनंता तुकाराम पोखरकर (रा.जुना चांडोली रस्ता मंचर) यांनी सोन्या व अन्य तीन बैलांसह गाडा पळवण्यासाठी घाटात सवाद्य मिरवणुकीने आणला होता. सोन्या घाटात पळण्यात तरबेज होता. घाटात त्याचे आगमन झाल्याबरोबर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले होते. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सोन्याला गाड्याला जुंपत असताना त्याने हिसका व उडी मारून धूम ठोकली. त्याचा गेली दोन दिवस सर्वत्र शोध घेतला पण तो मिळाला नाही. अखेर सोन्या हरवल्याची फिर्याद मंगळवारी (ता.२५) मंचर पोलिसांकडे देण्यात आली आहे. पोलिसांनीही वाहनांची तपासणी करून सदर बैलाचे फोटो दाखवून शोध मोहीम हाती घेतली आहे.

सोन्या बैलाचे वर्णन -

वय दोन, पाच फुट उंची, फिक्कट काळा पांढरा वर्ण (कोसा रंग) आहे. इतर प्राण्यांवर व मनुष्यावर हल्ला करण्याची शक्यता आहे. सदर वर्णनाचा बैल आढळून आल्यास मंचर पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक (०२१३३)२२३१५९ येथे किंवा बैलगाडा मालक अनंत पोखरकर यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन मंचर पोलिसांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com