

Eknath Shinde Assures Development Funds for Manchar
Sakal
मंचर : मंचर (ता. आंबेगाव)नगरपंचायत निवडणुक जाहीर प्रचार सभेत शिवसेनेच्या राजश्री दत्ता गांजाळे यांना नगराध्यक्षपदी निवडून देण्याचे आवाहन केले होते. आवाहनाला मंचरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नगरविकास खाते माझ्याकडे असून मंचरच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही," अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई येथे मंगळवारी (ता. २३) मंचर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजश्री गांजाळे , नगरसेवक विकास जाधव,लखन पारधी व अंशा इनामदार यांचा सत्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.