मंचर : मॅट्रिमोनिअल वेबसाईटचा गैरफायदा, लग्नाचं आमिष दाखवून तरुणीची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

matrimonial website

मंचर : मॅट्रिमोनिअल वेबसाईटचा गैरफायदा, लग्नाचं आमिष दाखवून तरुणीची फसवणूक

मंचर : माझ्याकडे चारचाकी गाडी, एक बंगला, सात एकर जमीन आहे... तुला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही.... तुझ्यासाठी अंगठी बनवायची आहे.... सोनाराकडे माप देण्यासाठी तुझ्या हातातील अंगठी दे....! असं सांगून १५ हजार रुपये किंमतीची अंगठी आणि अडीच हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन एका तरुणाने पोबारा केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंचर पोलिसांनी विजय शांताराम साबळे (रा.नाणे, ता.मावळ) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कुदळवाडी (ता.आंबेगाव) येथे ही घटना घडली. (Manchar Disadvantages of matrimonial website cheating on a young woman by showing the lure of marriage)

हेही वाचा: खेड-शिवापूर : विनाकारण घराबाहेर फिराल तर थेट कोविड सेंटरमध्ये जालं!

याबाबत पोलिसांकडे ३२ वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दाखल केली आहे. मावळ तालुक्यातील एका संस्थेच्या माध्यमातून मंचर (ता.आंबेगाव) येथील शाखा कार्यालयात प्रभाग व्यवस्थापक म्हणून पीडित तरुणी काम करत आहे. विवाहासाठी स्थळं पाहण्यासाठी तीने आपला बायोडाटा एका मॅट्रिमोनियल वेबसाईटवर टाकला होता. ११ एप्रिल रोजी तिला यावर प्रतिसाद मिळाला त्यात विजय साबळे याने मोबाईलद्वारे संपर्क करुन पीडित मुलीला स्वतःचा बायोडाटा पाठविला आणि “मला तुमच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे” असं मुलीला सांगितलं.

हेही वाचा: बारामती : नियंत्रण सुटल्यानं दुचाकी कालव्यात कोसळली; आजोबा-नातीचा अंत

या प्रथम संवादानंतर २१ एप्रिल रोजी कुदळेवाडी येथे पीडित तरुणी आणि विजय एकमेकांना भेटले. “मी रेल्वेमध्ये नोकरीला आहे. माझ्या घरी खूप प्रॉपर्टी आहे, असं खोटं सांगून विजयनं तरुणीला विश्वासात घेतलं. त्यानंतर काही कारणास्तव वाद झाल्यानंतर विजयने तरुणीला तुझी अंगठी व पैसे परत घेऊन जा. मला तुझ्याशी लग्न करायचं नाही, असं सांगून तिला सोमवारी (दि. ३) तळेगाव दाभाडे येथे अंगठी व पैसे घेण्यासाठी बोलावलं पण तरुणीला अंगठी व पैसे दिले नाहीत. तर “मी राजकीय कार्यकर्ता असून कोणालाही घाबरत नाही” अशी धमकी देऊन निघून गेला.

लग्नासंदर्भातील विजय साबळेने दिलेला बायोडाटा खोटा आहे, असं फिर्यादीत पीडित तरुणींने नमूद केलं आहे. याप्रकरणी पोलीस निरिक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अपर्णा जाधव पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Pune News