

Treasury Officer Suffers Heart Attack In Manchar Doctors Timely Treatment Helps Save His Life After Severe Chest Pain
esakal
-डी. के. वळसे पाटील
मंचर :घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील तहसीलदार कार्यालयातील उपकोषागार अधिकारी विजय अनंत दांगट (वय ५५) यांना गुरुवारी (ता. १७) सकाळी अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. तातडीने घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर ईसीजी तपासणीत हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाले. वेळ न दवडता त्यांना पुढील उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथील थ्रोम्बोलिसिस सेंटरमध्ये तत्काळ उपचार मिळाल्याने आणि हृदयरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे दांगट यांचे प्राण वाचले.