Manchar News : इथेनॉल निर्मितीबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे शिष्ठमंडळ भेटणार - सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील

'सहकरी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती करण्याबाबत केंद्र सरकारने काही मर्यादा दर्शवणारा निर्णय घेतला होता.
Dilip Walse Patil
Dilip Walse Patilsakal

मंचर - 'सहकरी साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती करण्याबाबत केंद्र सरकारने काही मर्यादा दर्शवणारा निर्णय घेतला होता. मात्र त्या संदर्भात सुधारणा करून निर्णय मागे घेतला असला तरी या निर्णयात अनेक त्रुटी आहेत.

यासंदर्भात तसेच कांदा व इतर प्रश्नाबाबतही नवी दिल्ली येथे सोमवारी (ता. १८) केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व मी चर्चा करणार आहे'. अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

मंचर (ता. आंबेगाव) येथे शनिवारी (ता. १६) वळसे पाटील पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 'देशातील सहकारी साखर कारखान्यांचे साखर उत्पादन कमी झाले आहे. साखर उत्पादनात वाढ होण्यासाठी कारखान्यांना इथेनॉल निर्मिती करता येणार नाही. असा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.

या निर्णयाला साखर कारखान्यांच्या पदाधिकारी यांच्याकडून विरोध झाला, त्यामुळे केंद्र सरकारने निर्णय मागे घेत काही सुधारणा केल्या आहेत. पण त्यामध्ये काही त्रुटी आहेत. त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. कांदा उत्पाद्कांचाही प्रश्न आहे. तसेच महाराष्ट्रातील इतरही प्रश्नांबाबत सोमवारी दिल्ली येथे शहा यांच्या समवेत शिष्टमंडळ चर्चा करणार आहे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com