महामार्गावर दुभाजक फोडून रस्ता (व्हिडिओ)

पेठ (ता. आंबेगाव) : रानवारा हॉटेलसमोर बेकायदा व अपघाताला निमंत्रण देणारा दुभाजक.
पेठ (ता. आंबेगाव) : रानवारा हॉटेलसमोर बेकायदा व अपघाताला निमंत्रण देणारा दुभाजक.

पेठ येथे वर्षभरात 35 लहान-मोठे अपघात; 10 जणांचा मृत्यू, 15 अपंग

मंचर (पुणे) : खेड ते सिन्नर राष्ट्रीय महामार्गावरून पारगाव तर्फे खेड (ता. आंबेगाव) या गावाकडे जात असताना सेवा रस्त्याचे काम गेल्या वर्षापासून प्रलंबित आहे. पेठ (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील महामार्गावर दुभाजक फोडून रस्ता केल्याने वर्षभरात 35 लहान-मोठे अपघात झाले आहेत. त्यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून 15 जणांना कायमचे अपंगत्व आले आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो.

मंचरच्या दिशेने पारगावकडे जाणाऱ्या वाहनचालकांचे अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पेठ ग्रामपंचायतीच्या हद्दीत हॉटेल गोविंदासमोर सेवा रस्त्याचे काम झाले नाही. त्यामुळे पारगावकडे जाण्यासाठी उजव्या बाजूने महामार्ग ओलांडून डाव्या बाजूला वाहनचालकांना जावे लागते, तसेच रानवारा हॉटेलसमोर दुभाजक फोडून वाहनांना वाट करून दिलेली आहे. त्यामुळे या दोन्ही हॉटेलसमोर वाहनांची धडक होऊन दर महिन्याला चार ते पाच भीषण अपघात होतात. भरधाव वाहनांच्या धडकी बसल्याने अनेक जण जण दगावले आहेत.

नागरिकांना हॉटेल गोविंदापासून जीव धोक्‍यात घालून राष्ट्रीय महामार्ग ओलांडावा लागतो. अनेक अपघात व दुर्घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रानवारा येथील फोडलेला दुभाजक भरून घ्यावा. गोविंदा हॉटेलसमोरील सेवा रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे. या मागणीची दखल न घेतल्यास पारगावच्या ग्रामस्थांना महामार्गावरील वाहतूक बंद पाडावी लागेल.
- सचिन पानसरे, सरपंच

अपघातात गंभीर जखमी
पेठ येथे मंगळवारी (ता. 30) संध्याकाळी निवृत्ती लक्ष्मण जाधव रामवाडी पारुंडे (ता. जुन्नर) हे मोटरसायकलवरून रस्ता ओलांडत असताना मंचरकडे जात असलेल्या मोटारीची धडक बसली. त्यामध्ये जाधव गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मंचर येथे खासगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिस हवालदार राजेंद्र हिले यांनी कारचालक उमेश सुरेंद्र यादव (रा. नाशिक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com