मंचर नगरपंचायत सन 23 -24 या आर्थिक वर्षामध्ये तीन कोटी ८६ लाख रुपये घर व पाणीपट्टी कर वसुली

"मंचर नगरपंचायतीने सन २३-२४ या आर्थिक वर्षामध्ये घरपट्टी कर वसुली तीन कोटी 22 लाख ५०हजार रुपये व पाणीपट्टी कर वसुली ६३ लाख ७० हजार रुपये अशी एकूण तीन कोटी ८६लाख वीस हजार रुपये वसुली झाली आहे.
मंचर नगरपंचायत सन 23 -24 या आर्थिक वर्षामध्ये तीन कोटी ८६ लाख रुपये घर व पाणीपट्टी कर वसुली
मंचर नगरपंचायत सन 23 -24 या आर्थिक वर्षामध्ये तीन कोटी ८६ लाख रुपये घर व पाणीपट्टी कर वसुलीSakal

मंचर : "मंचर नगरपंचायतीने सन २३-२४ या आर्थिक वर्षामध्ये घरपट्टी कर वसुली तीन कोटी 22 लाख ५०हजार रुपये व पाणीपट्टी कर वसुली ६३ लाख ७० हजार रुपये अशी एकूण तीन कोटी ८६लाख वीस हजार रुपये वसुली झाली आहे." अशी माहिती मंचर नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.

जाधव म्हणाले"मंचर नगरपंचायतीची घरपट्टी एकूण मागणी ४ कोटी २८ लाख ९५ हजार रुपये व पाणीपट्टी मागणी ९६ लाख ३२ हजार रुपये होती. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी कर धारकांशी संपर्क साधला. त्यांना पाणीपट्टी व घरपट्टी भरण्याविषयी वेळोवेळी आवाहन केले. नगरपंचायतीचे कर्मचारी सुजाता जाधव ,

विनायक मिर्झा, संगीता निघोट ,अतुल लोंढे ,नरेंद्र निघोट, स्मिता बाणखेले, रमेश डिंगोरकर ,चंद्रकांत गवारे, स्वप्नील लोंढे, अक्षय राजगुरू ,विभावरी देठे, सुजाता गवारे ,दिलीप थोरात ,शहाजी थोरात, सिद्धांत आवटे ,स्नेहा मिसाळ ,अर्चना बेंडे ,संदीप लोंढे, तुषार गांजाळे, नरेंद्र थोरात, सुरेश लोंढे या कर्मचाऱ्यांची कर वसुलीसाठी चार पथ के तयार केली. तसेच विभाग प्रमुख संदीप पवार, राजश्री मोरे, महेश पाचोरे ,

मनोज सरदार यांनी कर वसुलीसाठी सतत पाठपुरावा केला.नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे घरपट्टीची कर वसुली ७५.१८% व पाणीपट्टी कर वसुली ६६.१३% झाली आहे. मागील 22 -23 आर्थिक वर्षात घरपट्टी ५२.५५% पाणीपट्टी वसुली ,४५.६७% झाली होती. या आर्थिक वर्षामध्ये घरपट्टी वसुलीत २२. ६३% व पाणीपट्टी कर वसुलीमध्ये २०.४६% इतकी वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com