

Heavy Police Security Deployed at Manchar Election Strong Room
sakal
मंचर : मंचर(ता.आंबेगाव) नगरपंचायत निवडणुक मतमोजणी मंगळवारी (ता.३)होणार होती,पण रविवारी (ता.२१)रोजी होणार असल्याने मंचर क्रीडा संकुलाच्या इमारतीत कडेकोट पोलीस बंदोबस्तात ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. 24 तास स्ट्रॉंग रूम बाहेर सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंचर पोलीस ठाण्याचे उप पोलीस निरीक्षक सुरेश यादव यांच्यासह तीन पाळ्या मध्ये एकूण 24 पोलीस येथे बंदोबस्ताला तैनात केले आहे. या व्यतिरिक्त मंचर नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षकवरद थोरात, नगर अभियंता संदीप पवार, आरोग्य पाणीपुरवठा अभियंता राजश्री मोरे,कर निरीक्षक चित्रा औटी, आदी अधिकारीही येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.