Manchar News : नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यात तीस प्रशिक्षण केंद्रांचे होणार ऑनलाइन उद्घाटन

तरुणांच्या रोजगार संधीसाठी व ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी तीस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात प्रशिक्षण केंद्रांचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार.
Narendra Modi
Narendra ModiSakal

मंचर - 'प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रामार्फत तरुणांच्या रोजगार संधीसाठी व ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी पुणे जिल्ह्यात तीस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात प्रशिक्षण केंद्रांचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १९) रोजी दुपारी चार वाजता होणार आहे.

उद्घाटन कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली आहे' अशी माहिती पुणे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली.

ते म्हणाले, 'प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार ग्रामपंचात स्तरावर कौशल्य विकास केंद्रे सुरु होणार आहेत. या मध्ये एकूण नऊ हजार युवक युवतींना प्रशिक्षणाद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

त्यामध्ये अवसरी खुर्द, घोडेगाव, शिनोली (ता. आंबेगाव), नाणेकरवाडी, मेदनकरवाडी (ता. खेड) व नारायणगाव, ओतूर, आळेफाटा (ता. जुन्नर), भोलावडे, वेळू (ता. भोर), येवत, पतास, केडगाव (ता. दौंड), कुसगाव बुद्रुक, खडकाला सी टी (ता. मावळ), पिरंगुट, मन (ता. मुळशी), दिवे, वीर (ता. पुरंदर), बाबुर्डी, गुणवडी (ता. बारामती), कळंब वालचंदनगर, निमगाव केतकी (ता. इंदापूर), उरळीकांचन, लोणी काळभोर, कदम वाकवस्ती (ता. हवेली), शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, सणसवाडी (ता. शिरूर), मार्गासनी (ता. वेल्हे) येथील केंद्रांचा समावेश आहे.

प्रत्येक गावात उद्घाटन सोहळ्याच्या ठिकाणी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, संबंधित तालुक्यातील अधिकारी व कर्मचारी, महिला बचत गट, तंत्रनिकेतन, महाविद्यालये व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी, शिक्षक, पोलीस पाटील, आशावर्कर, अंगणवाडी सेविकानी कार्यक्रमात सहभागी व्हावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com