मंचरमध्ये मिरची प्रतिकिलो ५० रुपये 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

मंचर - आंबेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारी फरशीला प्रतिकिलो ऐंशी ते १०० रुपये, तर ज्वाला मिरचीला ५० ते ६० रुपये असा उचांकी बाजारभाव मिळाला. बीट, भेंडीच्या बाजारभावातही सुधारणा झाली आहे. पावसामुळे शेतीमालाची आवक २५ टक्‍क्‍यांनी घटली आहे. 

मंचर येथील बाजारात अवसरी खुर्द, पिंपळगाव, रांजणी, कळंब, गावडेवाडी, लांडेवाडी, सुलतानपूर, चांडोली बुद्रुक, लाखणगाव, चांडोली खुर्द, नांदूर, आदर्शगाव भागडी, लौकी, निरगुडसर, शिंगवे आदी ५० गावांतील शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी आणला होता.  

नुकताच पाऊस झाल्याने काही ठिकाणी शेतात पाणी साचले आहे, तसेच गाळ तयार झाला आहे. त्यामुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांना शेतीमालाची तोडणी करता आली नाही. येथील बाजारात बुधवारी नऊ हजार तरकारी मालाच्या पोत्यांची आवक झाली. गेल्या आठवड्यात बिटचा प्रतिकिलोचा बाजारभाव आठ ते दहा रुपये होता. गुजरात, हैदराबाद व नागपूर भागातून बिटला मागणी वाढली आहे. 

Web Title: manchar news green chili