esakal | मुळशी येथे पोलिसांची नाकाबंदी

बोलून बातमी शोधा

police
मुळशी येथे पोलिसांची नाकाबंदी
sakal_logo
By
सागर शेलार

पिरंगुट : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्या लॅाकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पौड पोलिसांनी आज नाकाबंदीला सुरवात केली असून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईला सुरवात केली. पुणे-कोलाड रस्त्यावरील भूगाव व घोटावडेफाटा येथील शिवशक्ती चौक आदी दोन ठिकाणी नाकाबंदी करून लॅाकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणारे व मोकाट फिरणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडविली जात होती. तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत चालल्याने पौड पोलिसांनी आता कडक पावले उचलली असून मोकाट फिरणारांना आता चाप बसणार आहे. तोंडाला मास्क न लावणे, विनाकारण रस्त्यावर मोकाट फिरणे , गर्दी करणे , सोशल डिस्टन्स न पाळणे आदी वर्तनांबद्दल आता गुन्हे दाखल करायला सुरवात केली आहे. आज सकाळपासून या कारवाईला सुरवात झाली.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात 1 मेपर्यंत काय असतील निर्बंध? 18 प्रश्नांची उत्तरे

पौड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचाऱी या कारवाईसाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. घोटावडेफाटा येथील चौकात बॅरिकेड्स लावण्यात आले होते. यावेळी वाहतूक पोलिस तुषार भोईटे, सुनील मगर, प्रशांत शिंदे, जालिंदर तापकीर तसेच अन्य कर्मचारी यांनी तपासणी नाक्यांवर वाहनांची कडक तपासणी करायला सुरवात केली होती.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर