

Manchar Police News 14 People Face Police Case After Creating Ruckus and Disrupting Police Work at the Police Station
esakal
मंचर : मंचर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याच्या अनुषंगाने समजूत काढण्याचे काम सुरू असताना १४ जणांनी एकत्र येत मोठ्याने आरडाओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग केला. तसेच पोलिसांच्या कामात अडथळा आणत परस्परांमध्ये बाचाबाची, वादविवाद आणि शिवीगाळ केल्याचा प्रकार बुधवारी (ता. २५) घडला. याप्रकरणी मंचर पोलिसांनी १४ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १९४ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.