Manchar News : मंचर जवळ रस्ता रोको आंदोलन, ३१ जणांसह २५० कार्यकर्त्यांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

Manchar Roadblock : पिंपरखेड (ता.शिरूर )येथे रोहन विलास बोंबे (वय १३) या शाळकरी मुलाचा नरभक्षक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. ३१ जणांसह २५० कार्यकर्त्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा.
 Manchar road blocked by protesters

Manchar road blocked by protesters

sakal

Updated on

मंचर : हल्ल्याच्या निषेधार्थ व वन विभागाचे लक्ष वेधण्यासाठी पुणे–नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ गायमुख-नंदीचौक (ता.आंबेगाव) येथे सोमवारी (ता.३) करण्यात आलेल्या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झालेल्या ३१ जणांसह २०० ते २५० कार्यकर्त्यांविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस काॅन्स्टेबल अजित रघुनाथ पवार यांनी गुरुवारी (ता.६) रात्री दहा वाजता मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. “बेकायदेशीर जमाव जमवुन महामार्गावरील वाहने अडवून लोकसेवक यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता लोकसेवकांचे सार्वजनिक कार्य पार पाडण्यास अटकाव करून रस्ता रोको आंदोलन केले आहे. म्हणून माझी त्यांचे विरूध्द कायदेशीर फिर्याद आहे.” असे पवार यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com