Manchar Protest : बिबट्याला ठार करा, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ बेमुदत रस्ता रोको आंदोलन

Man-Eater Leopard Kills Schoolboy in Pimpar Khed : पिंपरखेड (ता. शिरूर) येथे नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलगा रोहन बोंबे (वय १३) याचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त ग्रामस्थ आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बिबट्याला ठार मारण्याची व परिसर बिबटमुक्त करण्याची मागणी करत पुणे-नाशिक महामार्गावर मंचरजवळ बेमुदत रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
Man-Eater Leopard Kills Schoolboy in Pimpar Khed

Man-Eater Leopard Kills Schoolboy in Pimpar Khed

Sakal

Updated on

मंचर : पिंपरखेड (ता.शिरूर )येथे रोहन विलास बोंबे (वय १३) या शाळकरी मुलाचा नरभक्षक बिबट्याने केलेला हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. रविवारी (ता.२) संध्याकाळी घडलेल्या घटनेमुळे परिसरात वन खात्याविषयी व राज्य शासनाविषयी संतापाची लाट पसरली आहे. बिबट्याला ठार करावे, हा परिसर बिबटमुक्त करून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळ तांबडेमळा-भोरवाडी (ता.आंबेगाव) येथे नंदी चौकात सोमवारी (ता.३) सकाळी दहा वाजता ग्रामस्थ व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी बेमुदत रस्ता रोको आंदोलन सुरु केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com