
मंचर : मंचर नगरपंचायतीने कार्यारंभ आदेश दिलेल्या ११० कोटी रुपये खर्चाची इमारती व रस्त्यांची एकूण ७० कामे मर्जीतल्या ठेकेदारांना देण्यात आली आहेत.कामाच्या अंदाजपत्र किमतीपेक्षा एकही काम कमी किमतीचे आढळून येत नाही.तीस कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाला असून या कामाच्या निविदा प्रक्रिया व दर्जा विषयी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करावी. या मागणीसाठी मंचर ग्रामपंचायतचे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी मंगळवार (ता.१३) पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
मंचर नगरपंचायतीचे मुख्यालय पहिल्या मजल्यावर असून नगरपंचायत दरवाजासमोरच गांजाळे यांनी उपोषण सुरू केले आहे.