

The Manchar ST Accident on Pune–Nashik Highway injured 20 students and 5 teachers from Sahayadri Junior College.
Sakal
मंचर : संगमनेर(जि.अहिल्यानगर) येथील सह्याद्री जुनियर कॉलेज विद्यार्थ्यांची सहल कोकण दर्शन करून माघारी संगमनेरला जात असताना गुरुवारी पहाटे (ता.११) पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता.आंबेगाव)जवळ एकलहरे येथे असलेला गतिरोधक लक्षात आला नाही.गतीरोधकामुळे अचानक एस.टीची गती कमी झाली.त्यामूळे मागून आलेल्या एस.टीची जोरदार धडक बसली.त्यामुळे मागून आलेल्या एसटी गाडीच्या सर्व काचा फुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या अपघातात २० विद्यार्थी व पाच शिक्षक जखमी झाले असून त्यांच्यावर मंचर येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यत आले.