

Deputy CM Eknath Shinde
मंचर : “नगरविकास खात्याचा मंत्री मी आहे.मंचर पाणीपुरवठा योजनेसाठी १३३ कोटींचा प्रस्ताव माझ्याकडे आहे. मी तो तात्काळ मंजूर करणार. मी बाळासाहेबांचा सैनिक आहे. एकदा कमिटमेंट केली की पूर्ण करतो.त्यासाठी मंचरच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या राजश्री गांजाळे व इतर १६ उमेदवारांना निवडून द्या.” असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मंचर(ता.आंबेगाव)येथे शुक्रवारी(ता.२८)मंचर नगरपंचायत निवडणूक शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते. यावेळी आमदार शरद सोनवणे,विकास रेपाळे,देविदास दरेकर,रमेश येवले,नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राजश्री गांजाळे,दत्ता गांजाळे,सचिन बांगर,प्रवीण थोरात,बाबू पाटे,अजित चव्हाण,रविंद्र वळसे पाटील,सुरेखा निघोट उपस्थित होत्या.