मुख्य रस्त्यावरच भरते मंडई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

रावेत - मंडईसाठी त्वरित जागा देण्याची मागणी रुपीनगरमधील भाजी विक्रेत्यांच्या संघटनेने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. संघटनेचे शंभराहून अधिक सदस्य आहेत.

रुपीनगर, सहयोगनगर, त्रिवेणीनगर या भागांत सुमारे ४० ते ४५ हजार लोकवस्ती आहे. येथे मोठ्या प्रमाणात कामगार राहतात. या भागात अधिकृत मंडई नसल्याने फळ व भाजी विक्रेते मुख्य रस्त्यावरच दुकाने थाटतात. त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास नागरिकांसह विक्रेत्यांनाही सहन करावा लागतो. शिवाय परिसरात दुर्गंधी पसरते ते वेगळेच. यामुळे येथील नागरिकांचीही स्वतंत्र मंडईची मागणी आहे. 

भाजी विक्रेते दुकानाच्या दारात भाजी विक्री करीत असल्यामुळे त्यांना दुकानदाराला भाडे द्यावे लागते. शिवाय पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या नियमित होणाऱ्या कारवाईमुळेही ते त्रस्त झाले आहेत. स्वतंत्र भाजी मंडईची संघटनेने अनेक वेळा मागणी करूनही पालिकेकडून आजपर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नसल्याने गरीब व्यावसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. यासंदर्भात विक्रेता संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब काळोखे म्हणाले, ‘‘तात्पुरती पत्राशेड उभारून किंवा नाल्यावर स्लॅब टाकून येथील मंडईचा प्रश्न सोडविता येईल. याचा पालिकेने विचार करण्याची गरज आहे.’’

हा परिसर रेडझोनच्या हद्दीत येत असल्याने नागरी सुविधा देताना त्याचा विचार करावा लागतो. तरीही नाल्यावर स्लॅब टाकून किंवा खासगी जागेत मंडई उभारून हा प्रश्न सोडविण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे दिला आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा व व्यावसायिकांचा मंडईचा प्रश्न लवकरच सुटेल.  
- पौर्णिमा सोनवणे, नगरसेविका

सध्या येथे व्यवसाय करणे कठीण झाले आहे. रस्त्यावर विक्री करावी लागत असल्याने ग्राहकांची गैरसोय होतेच, शिवाय रोजची पालिकेची कारवाई व तुटपुंजे उत्पन्न यामुळे अडचणी वाढल्या आहेत. स्वतंत्र जागा मिळाल्यास नियमित व चांगला व्यवसाय करता येईल. ग्राहक व विक्रेता दोघांनाही न्याय मिळेल.
- सुरेखा पाचारणे, भाजी विक्रेत्या 

Web Title: mandai on main road in ravet