esakal | कोरोनाची माहिती रुग्णालयांना रोज देणे बंधनकारक
sakal

बोलून बातमी शोधा

Corona-Virus

कोरोनाच्या रुग्णांबाबतची दैनंदिन माहिती अदययावत करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी आज या बाबतचे परिपत्रक जारी केले आहे. या मुळे शहरातील सर्व रुग्णालयांमधील माहिती ठरलेल्या नमुन्यांमध्ये प्रत्येक रुग्णालयाला दररोज अदययावत करावी लागणार आहे. 

कोरोनाची माहिती रुग्णालयांना रोज देणे बंधनकारक

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती - कोरोनाच्या रुग्णांबाबतची दैनंदिन माहिती अदययावत करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी आज या बाबतचे परिपत्रक जारी केले आहे. या मुळे शहरातील सर्व रुग्णालयांमधील माहिती ठरलेल्या नमुन्यांमध्ये प्रत्येक रुग्णालयाला दररोज अदययावत करावी लागणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामती शहर व तालुक्यातील विविध रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण दाखल करुन घेतले जातात. या रुग्णांबाबतची माहिती अनेकदा रुग्णालयांकडून दिली जात नाही, वास्तविक ही माहिती देणे बंधनकारक आहे. अनेक रुग्णालयामध्ये दाखल होणा-या सर्व रूग्णांची माहिती सदरच्या पोर्टलवर नोंद केल्याची दिसून येत नाही. 

'महालाभार्थी'द्वारे घेता येणार झेडपी योजनांचा घरबसल्या लाभ

ही माहिती अद्ययावत नसल्याने शासनस्तरावर नगरपालिकेला वारंवार ताकीद दिली गेली आहे.  उपचार घेत असलेले रूग्ण,  बरे होऊन घरी गेलेले रूग्ण व मृत्यूमुखी पडलेले रूग्ण याबाबतच्या संख्येमध्ये तफावत दिसते. या मुळे सर्व रुग्णालयांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून आयडी व पासवर्ड प्राप्त करुन घ्यावेत व सर्व रुग्णांच्या नोंदी पोर्टलवर अद्ययावत कराव्यात, नगरपालिकेलाही ही माहिती कळवावी, असे मुख्याधिका-यांनी नमूद केले आहे. 

निष्काळजीपणे सिझेरियन करणाऱ्या दोन डॉक्‍टरांना दहा वर्षे तुरुंगवास

मृत रुग्णाबाबतही निर्देश...
कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाबाबत हा मृतदेह हाताळण्याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना असून त्याचेही पालन होत नसल्याचा आक्षेप मुख्याधिका-यांनी नोंदविला आहे. या बाबत सविस्तर प्रक्रीया असून तिचे पालन करणे संबंधित रुग्णालयांवर बंधनकारक असल्याचे त्यांनी आदेशात नमूद केले आहे. 

Edited By - Prashant Patil