esakal | पुणे परिसरात गारांच्या पावसाच्या हजेरीने आंबा बागायतदार काळजीत
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे परिसरात गारांच्या पावसाच्या हजेरीने आंबा बागायतदार काळजीत

पुणे परिसरात गारांच्या पावसाच्या हजेरीने आंबा बागायतदार काळजीत

sakal_logo
By
शीतल बर्गे

बालेवाडी : पुणे शहर व परिसरात आज (ता. 27) रोजी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली त्याचबरोबर अनेक ठिकाणी गारांचा पाऊसही पडला. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या कहर आणि एकंदर तणावाच्या परिस्थितीत पावसाचे अचानक हजेरी ही पुणेकरांसाठी थोडीशी अल्हाददायक ठरली. पण या भागातील आंब्याचे बागायतदार तसेच पालेभाज्या आणि इतर उन्हाळी फळांवर गाराच्या माऱ्यामुळे परिणाम होतो त्यामुळे शेतकरी काळजीत पडले आहेत. पुणे शहर व परिसरात आज चारच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली असतानाच अचानक गारा पडू लागल्या,पावसाचा जोर वाढला तसा गारांच्या जोरही वाढला.लॉकडाऊन मध्ये सगळी मंडळी घरात असल्याने सगळ्यांनी गारांच्या पावसाचा आनंद घेतला.सध्याच्या कोरोना संसर्गाचा कहर आणि एकंदर तणावाच्या परिस्थितीत पावसाची अचानक हजेरी ही पुणेकरांसाठी थोडीशी अल्हाददायक ठरली असली, तरी बाणेर बालेवाडी शहरातील स्थानिक शेतकऱ्यांच्या शेत जमिनी ह्या शहरानजीक परिसरामध्ये आहेत.

हेही वाचा: 'मोक्का' लागलेल्या दिप्ती काळेची ससूनच्या 8 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

काही शेतकऱ्यांच्या आंब्याच्या, चिकूच्या बागा ही आहेत. जशा गारा पडू लागल्या तशी त्यांना आंब्याच्या बागेची, इतर भाजीपाला, फळांची काळजी वाटू लागली कारण हा अवकाळी पाऊस असल्यामुळे याचा फटका सर्वच शेत मालाला बसतो. त्यातच आंब्यासारखा फळांचा राजा मात्र बाजारपेठेत बॅकफूटवर जाण्याची चिन्हे आहेत.नुकताच पाड लागलेल्या मागास आंब्याला या पावसामुळे आणि गारपीटीने फटका बसणार आहे. तसेच, साठवणुकीतील आंब्यालाही हे वातावरण पोषक नाही. त्यामुळे किरकोळ बाजारातील आंब्याचे भाव अनिश्चित होऊ शकतात. तसेच, आंब्याचा फळाच्या गुणवत्तेवरही परिणाम होऊ शकतो. आतापर्यंत आंब्याचा बाजारभाव केवळ उच्च मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारा आहे. अक्षय्य तृतीयेपर्यंत हा बाजारभावाचा आलेख चढताच राहतो. या पावसामुळे आंब्याचा फळाच्या गुणवत्तेवरही परिणाम होऊ शकतो. परिणामी दर कमी झाले तरी गुणवत्तेला फटका बसल्याने आंबाशौकिनांचा रसभंगही होऊ शकतो.

आमची खेडशिवापूर जवळ हापूसची 350 झाडे असून आजच काही झाडांना पाड लागला आहे. अवकाळी पाऊस व गार पिटी मुळे फळाना मार लागून काळे डाग पडतात. कैरी असताना काळे डाग दिसतात मात्र जेव्हा आंबे पिकायला सुरुवात होते तेव्हा मात्र मार लागलेल्या जागीच आंबा खराब निघतो.यामुळे आंब्याचा दर्जा खालवतो.

- अमित बर्गे, आंबा बगायदार

loading image
go to top