मार्केट यार्डमध्ये  आंबा महोत्सव पुन्हा सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

पुणे - पिकलेला आंबा कोठे ठेवायचा...तो विकला गेला पाहिजे...आंबा महोत्सव पुन्हा सुरू झालाय आता बघू काय प्रतिसाद मिळतोय.. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक बाळकृष्ण थोटम बोलत होते. गेल्या आठवड्यात पणन मंडळाने आयोजित केलेल्या आंबा महोत्सवाच्या मंडपाला आग लागून मोठे नुकसान झाले होते. हा आंबा महोत्सव मार्केट यार्ड येथे पुन्हा सुरू झाला आहे. 

दर वर्षीप्रमाणे पणन मंडळातर्फे मार्केट यार्ड येथील मुख्य कार्यालयाशेजारील जागेत आंबा महोत्सवाचे आयोजन केले होते. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मंडपात ६३ स्टॉल उभारण्यात आले होते. सुमारे ७८ शेतकरी यात सहभागी झाले होते. गेल्या आठवड्यात आगीच्या घटनेत हा मंडप आणि आंब्याच्या पेट्या, बॉक्‍स जळून भस्मसात झाले. याबाबत पणनमंत्री सुभाष देशमुख आणि शेतकऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. त्यात शेतकऱ्यांनी आंबा महोत्सव पर्यायी जागेत त्वरित सुरू करा, अशी मागणी केली होती. त्यानुसार पणन मंडळाच्या कार्यालयाशेजारी असलेल्या रस्त्यावर आंबा महोत्सवाचा मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी आंबा विक्री पुन्हा सुरू झाल्याचे मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी कळविले आहे.

आगीच्या घटनेतील नुकसान भरपाईसंदर्भात अद्याप निर्णय झाला नसून, मंडळाचे प्रशासन सकारात्मक आहेत. महसूल विभाग आणि पोलिस यांनी पंचनामा केला आहे. 

Web Title: Mango Festival in the market yard