माणिकडोह धरणाखालील गावांसाठी पाण्याचे नियोजन करण्याचे आश्वासन 

दत्ता म्हसकर
शनिवार, 12 मे 2018

धरणाखालील माणिकडोह, खामगाव, पाडळी, अलदरे, गोळेगाव,कुमशेत,शिरोली खुर्द व बुद्रुक आदी गावांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.यावर्षी चांगला पाऊस होऊन देखील पाण्याअभावी काही शेतकऱ्याची पिके जळू लागली.

जुन्नर : 'आमच्याच पाण्यासाठी आमचा संघर्ष'सुरू असून धरणाखालील गावांसाठी 'माणिकडोह'च्या पाणीसाठ्याचे नियोजन करण्याचे आश्वासन आमदार शरद सोनवणे यांनी दिले असल्याची माहिती खामगाव (ता.जुन्नर) चे युवा सदस्य अजिंक्य घोलप यांनी दिली.

धरणाखालील माणिकडोह, खामगाव, पाडळी, अलदरे, गोळेगाव,कुमशेत,शिरोली खुर्द व बुद्रुक आदी गावांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.यावर्षी चांगला पाऊस होऊन देखील पाण्याअभावी काही शेतकऱ्याची पिके जळू लागली तर नदीपात्रात पाणी कमी राहिल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याची ओरड होऊ लागल्याने घोलप यांनी प्रसार माध्यमाच्या सहकार्याने ही मागणी केली. ई सकाळ व सकाळ मध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाले. 

याबाबत दूरध्वनीवर आमदार शरद सोनवणे याच्याशी संपर्क झाला यावेळी त्यांनी आपण लवकरच याबाबतचे नियोजन करणार असून आठवड्यातून एकदा या गावांसाठी पाणी सोडण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले तसेच शेतकऱ्यांनी देखील आपली पाणीपट्टीची रक्कम लवकरात लवकर भरावी असे आवाहन त्यांनी केले असल्याचे घोलप यांनी सांगितले. 

Web Title: Manikdoh dam water issue

टॅग्स