

Overcrowded cages put captured leopards at risk
sakal
अशोक खरात
खोडद : जुन्नर वनपरिक्षेत्रात आतापर्यंत बिबट्यांच्या हल्ल्यात ५६ जणांचा मृत्यू झाला असून यामुळे येथील मानव बिबट संघर्ष अधिक तीव्र झालेला पाहायला मिळत आहे.या वनपरिक्षेत्रातील मानव बिबट संघर्ष कमी करण्याचे आव्हान वनविभागासमोर असतानाच माणिकडोह येथील बिबटे ठेवण्याची क्षमता संपली असल्याने आता नवीन पकडलेले बिबटे कसे व कुठे ठेवायचे ही नवीन समस्या आता वनविभागासमोर निर्माण झाली आहे.