नृत्य, गायन, अभिनयाने रंगले अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन

कृष्णकांत कोबल
गुरुवार, 29 मार्च 2018

मांजरी - आताच बया का बावरलं...सांज ये गोकुळी...शुक्रतारा मंदवारा...जाळीमंदी पिकली करवंद... अशी एकापोक्षा एक बहारदार गीते सादर करीत प्रसिद्ध गायिका शेफाली कुलकर्णी यांनी अण्णासाहेब मगर महाविद्यालयातील अवघी तरूणाई थिरकवली. निमित्त होते वार्षिक स्नेहसंमेलनाचे. नृत्यांगना कादंबरी दानवे व संकेत ससाणे यांच्या गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. महाविद्यालयातील विध्यार्थ्यांनी त्यांचे विविध कलागुण सादर केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यायात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उदघाटन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांच्या हस्ते झाले. प्रसिद्ध गायिका शेफाली कुलकर्णी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी प्रास्ताविक केले. 

उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब बेंद्रे, डॉ. आनंद महाजन, प्रा. अनिल जगताप, प्रा. शोभावती महाजन, डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, डॉ. मेघना भोसले, प्रा. शहाजी शिंदे, डॉ. प्रवीण ससाणे, डॉ. नाना झगडे, प्रा. नितीन लगड आदी यावेळी उपस्थित होते.

गायिका कुलकर्णी म्हणाल्या,"भारतीय कलांमध्ये असलेली विविधता हे आपल्या समृद्ध संकृतीचे वैशिष्ट आहे. मराठी माणूस आणि कला यांचे अतूट नाते आहे. नृत्य, गायन, वादन, चित्रकला, हस्तकला या विविध कलांमध्ये मराठी माणसाने आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. भारतीय संगीत हे रसभरित आणि वैविध्यपूर्ण आहे. राग व ताल या भारतीय संगीतातील प्राथमिक संकल्पना आहेत. भारतीय संगीताची नेमकी जाण येण्यासाठी आयुष्य कमी पडेल, इतके संगीत विशाल आणि सखोल आहे. त्यामध्ये रस असणाऱ्यांनी कायम विद्यार्थीच राहिले पाहिजे.'' 

यावेळी विविध शाखेतील विद्यार्थ्यांनी कलाविष्कार सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले.
 
Web Title: manjari performing art aanasaheb magar collage gathering