Manjari News : तहानलेल्या मांजरीकरांना पेयजल योजनेच्या पाण्याची भर उन्हाळ्यातही प्रतिक्षाच

गेली वर्षभरापासून महिना - पंधरा दिवसांची अश्वासने देऊनही मांजरीकरांच्या हंड्यात मात्र पेयजल योजनेचे पाणी अद्याप पडलेच नाही. योजनेचे काम आजूनही अपूर्ण अवस्थेत असून त्याच्या पूर्ततेचा नेमका दिवस सांगता येत नाही.
manjari water crisis peyjal scheme water supply through water tank
manjari water crisis peyjal scheme water supply through water tankSakal

मांजरी : गेली वर्षभरापासून महिना - पंधरा दिवसांची अश्वासने देऊनही मांजरीकरांच्या हंड्यात मात्र पेयजल योजनेचे पाणी अद्याप पडलेच नाही. योजनेचे काम आजूनही अपूर्ण अवस्थेत असून त्याच्या पूर्ततेचा नेमका दिवस सांगता येत नाही.

त्यामुळे पाण्यासाठी वनवन फिरणाऱ्या मांजरीकरांना यंदाच्या उन्हाळ्यातही या योजनेच्या पाण्याची केवळ प्रतिक्षाच करावी लागणार असल्याचे दिसत आहे. सात वर्षापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून येथील पेयजल योजनेच्या कामाला सुरुवात झाली होती.

दोन वर्षांपूर्वी या योजनेचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात आजही या योजनेचे काम अपूर्णच आहे. दोन-तीन ठिकाणी क्रॉसिंगचे काम रखडले आहे. त्यामुळे टाक्यांमध्ये पाणी पोहचण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

महादेवनगर, घुलेवस्ती, गोपाळपट्टी या भागात टाक्यांमधून वितरिकेत पाणी पोहचले आहे. मात्र, पालिकेकडून कनेक्शन देण्याचे नियोजन होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वनवन फिरावे लागत आहे.

गावठानातील नागरिकांना पालिकेकडून टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अनेक वेळा आठ-आठ दिवस तो येत नाही. अपूरा पाणीपुरवठा होत असल्याने हजारो रूपये मोजून विकत पाणी घ्यावे लागते. बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत.

फेब्रुवारीच्या सुरूवातीलाच पाण्याचा तुटवडा सुरू झाला आहे. पुढील तीन चार महिने कसे जातील, या चिंतेने महिला वर्ग त्रस्त आहे. त्यामुळे पालिकेने तातडीने नळ कनेक्शन देऊन योजनेचा पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी रोहिणी तुपे,

राजेंद्र साळवे, ऋतुजा जगताप, मीरा रामलिंग, रोहिणी कुदळे, प्रियांका कापरे, रुचिता कापरे, सीमा घुले, सुनिता ढेकणे, पंकज घुले, सूरज घुले, विलास घुले, प्रा. अरुण झांबरे, मधुकर कवडे, दिलीप बहिरट यांनी केली आहे.

"के. के. घुले विद्यालय येथे पन्नास मीटरचे क्रॉसिंग तर सोलापूर महामार्गावर दोन-तीन ठिकाणी वाहिनीची अडवणूक झाली आहे. त्यामुळे काम रखडले आहे. मात्र, महादेवनगरच्या बाजूने रेल्वे लाईन पर्यंत पाणी पोहोचले आहे. तेथील मिळकतदारांना नळ कनेक्शन देण्यास हरकत नाही. त्याबाबत पालिकेला पत्रव्यवहारही केला आहे.

- महादेव देवकर उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

"मांजरी पाणी योजनेचे काम अजूनही अपूर्ण आहे. ते पूर्ण झाल्याशिवाय योजना पालिकेकडे हस्तांतरित होऊ शकत नाही. मात्र, योजना पूर्ण होण्यासाठी पालिकेने विज बिल भरण्याबरोबरच राहिलेल्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. सध्या ज्या ठिकाणापर्यंत वितरिकेतून पाणी पोहोचले आहे त्या भागात, विशेषता महादेव नगर व गोपाळपट्टी येथे मिळकतदारांना नळ कनेक्शन साठी मागणी करता येईल. त्यानंतर त्यांना कनेक्शन दिले जाईल.'

- इंद्रभान रणदिवे अधीक्षक अभियंता, महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग

अशी आहे योजना

योजनेचा एकूण खर्च - ४३ कोटी रुपये

मुख्य जलवाहिनीची लांबी - सुमारे १५ किमी.

शुध्दीकरण केंद्र क्षमता - १२ दसलक्ष लीटर

गावाला मिळणारे पाणी - १० दसलक्ष लीटर

साठवण टाक्या - ३ (पहिल्या ३)

साठवण टाक्यांची क्षमता - सुमारे २४ लाख लीटर

अंतर्गत जलवाहिनीची लांबी - ५० किमी.

वाढीव अंतर्गत जलवाहिनीची लांबी - २५ किमी.

वाढीव खर्च - २४ कोटी रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com